मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र

अनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्याचे अपात्र ठरवण्याचे अधिकार

पोटकलम १९ च्या खंड (फ) च्या प्रयोजनासाठी, अनुज्ञप्ती धारकाच्या खाली नमूद केलेल्या कृती म्हणजे लोंकाना उपद्रव किंवा धोका असतील :

  1. मोटार वाहनाची चोरी.
  2. उतारूवर हल्ला.
  3. उतारूच्या वैयक्तिक चीजवस्तूंची चोरी.
  4. मालमोटारीमधून वाहून नेल्या जाणाऱ्या मालाची चोरी.
  5. कायद्याने मनाई केलेल्या मालाची वाहतूक.
  6. परिवहन वाहन चालवत असताना चालकाने त्याची एकाग्रता भंग होण्याची ‍ शक्यता असेल असे कृत्य करणे.
  7. प्रवाशांचे अपहरण
  8. मालवाहू वाहनात अतिरिक्त माल वाहून नेणे.
  9. विनिर्दिष्ट मर्यादेपेक्षा अधि‍क वेगाने वाहन चालवणे.
  10. भाडे घेऊन किंवा न घेता मालमोटारीतून चालकाच्या केबिनमध्ये तिच्या क्षमतेपेक्षा अधिक‍‍ व्यक्तीना नेणे किंवा त्या वाहनातून व्यक्तींची ने-आण करणे
  11. कलम १३४ मधील तरतूदींचे पालन न करणे.
  12. वाहन थांबवण्याचा प्राधिकार असलेल्या कोणत्याही व्यक्तीने ते थांबवण्याचा इशारा केला असता ते न थांबवणे
  13. प्रवाशांशी गैरवर्तन करणे किंवा उद्धटपणे वागणे, प्रवाशांना किंवा माल पाठविणारे अथवा ज्याच्याकडे माल पाठवला त्यांना धाक दाखविणे.
  14. सार्वजनिक सेवा वाहने चालवताना धूम्रपान करणे.
  15. सार्वजनिक ठिकाणी वाहन सोडून रस्ता वापरणाऱ्या इतर लोकांची किंवा वाहनातल्या प्रवाशांची गैरसोय करणे.
  16. दारूच्या किंवा अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली वाहन चालवणे.
  17. इतर कोणत्याही वाहनात चढून बसणाऱ्या किंवा बसण्याच्या तयारीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अडथळा निर्माण करणे.
  18. चालकाला रस्ता स्पष्ट‍ दिसण्यात किंवा वाहन नियंत्रणात ठेवण्यात अडथळा येईल अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीला बसू देणे किंवा काही वस्तू ठेवणे.
  19. वाहकाच्या किंवा वाहनातून खाली उतरण्यास इच्छुक प्रवाशाच्या मागणीवरून किंवा इशाऱ्यावरून आणि वाहनामध्ये जागा असल्यास प्रवास करण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही ‍व्यक्तीच्या मागणीवरून किंवा इशाऱ्यावरून मंजूर थांब्यांच्या जागी सुरक्षित आणि सेाईस्कर ‍‍ स्थितीत पुरेसा वेळ वाहन न थांबवणे.
  20. कोणत्याही प्रवासात वेळ घालवणे किंवा विनाकारण वेळ काढणे आणि प्रवासाच्या गंतव्य स्थानाकडे शक्यतो वाहनाशी संबधित वेळापत्रकानुसार न जाणे किंवा असे कोणतेही वेळापत्रक नसलेल्या ठिकाणी योग्य त्या वेगाने न जाणे.
  21. योग्य कारणाशिवाय कंत्राटावर भाड्याने घेतलेले वाहन सांगतिलेल्या ‍इच्छित ठिकाणी सर्वात जवळच्या रस्त्याने न नेणे
  22. मोटार कॅबच्या चालकाने प्रवासाची लांबी लक्षात न घेता भाड्याची जी पहिली मागणी येईल ती न स्वीकारणे.
  23. मोटार कॅबच्या चालकाने, कायदेशीर भाड्यापेक्षा अधिक भाडयाची मागणी करणे किंवा ते जबरदस्तीने घेणे अथवा मोटार - कॅब चालवण्याचे नाकारणे.
  24. नागरिकांना, प्रवाशांना किंवा सार्वजनिक जागेचा अथवा इतर कोणत्याही जागेचा वापर करणाऱ्या इतरंना अडथळा येईल किवां त्यांची गैरसोय होईल अशा रीतीने अशा जागी निषेध म्हणून किंवा कोणत्याही प्रकारचे आंदोलन म्हणून‍ किंवा संप म्हणून परिवहन वाहन सोडून देणे.
  25. वाहन चालवत असताना मोबाईल फोनचा वापर करणे.
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.