मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)

HSRP

  • दि. ०१.०४.२०१९ किंवा त्यानंतर नोंदणीकृत वाहने ज्यांना आधीच HSRP प्लेट्स बसवलेल्या आहेत, त्यांना HSRP बसवण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  • वाहनधारकांनी HSRP फिटमेंट सेंटरला भेट दिल्यास त्यांच्याकडून फिटमेंटसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, जर त्यांनी HSRP फिटमेंट आपल्या घरी बसविण्याचा पर्याय निवडला, तर त्यांना संबंधित विक्रेत्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
  • जर एकाच ठिकाणी (सोसायटी/पार्किंग लॉट/ऑफिस, इ.) २५ किंवा त्याहून अधिक वाहन मालकांनी बल्क बुकिंग केल्यास, संबंधित वाहन मालकांना HSRP लावण्यासाठी कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही.
  • महाराष्ट्रात कोणत्याही RTO कार्यालयात नोंदणी झालेल्या वाहनास HSRP बसविणाऱ्या एजन्सीकडून राज्यातील इतर शहरात HSRP फिटमेन्ट सेंटरमध्ये HSRP बसविता येईल. तरी संबंधित वाहन मालकांनी त्यांच्या निवास्थानाच्या अथवा कामाच्या ठिकाणी नजीकचे फिटमेन्ट सेंटर निवडावे.
 

Continue   HSRP ऑनलाइन बुकिंगHSRP FAQ

या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.