मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)

न्यायालयाद्वारे पृष्ठांकन

खाली विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अपराधासाठी अनुज्ञप्तीधारकांना दोषी ठरविणाऱ्या न्यायालयाने, अशा अपराधांच्या तपशिलाबाबत चालकाच्या अनुज्ञप्तीमध्ये शेरा लिहिला पाहिजे किेवा तो नमूद करण्याची व्यवस्था केली पाहिजे. ते अपराध पुढीलप्रमाणे :

  1. अनुज्ञप्ति नसताना किंवा प्रभावी अनुज्ञप्ति नसताना किंवा चालवण्यात येणाऱ्या वाहनाला लागू असणारी अनुज्ञप्ति नसताना वाहन चालवणे‍ (कलम ३).
  2. दुसऱ्या व्यक्तीला अनुज्ञप्तिचा वापर करू देणे ( कलम ६ (२) ).
  3. अपात्र ठरवण्यात आल्यानंतरही वाहन चालवणे ( कलम २३ ).
  4. नोंदणी न केलेले वाहन चालवणे ( कलम ३९ ).
  5. योग्ता प्रमाणपत्राच्या कक्षेत न येणारे परिवहन वाहन चालवणे ( कलम ५६).
  6. कलम ११८ चे उल्लंघन करून वाहन चालवणे.
  7. कलम ६६ चे उल्लंघन करून वाहन चालवणे.
  8. कलम ११४ मधील तरतुदीचे पालन न करणे ;
  9. विविर्दिष्ट मुदतीत अनुज्ञप्ति किंवा नोंदणी प्रमाणपत्र हजर करण्यास नकार देणे किंवा ते हजर न करणे (कलम १३०).
  10. कलम १३२ अंतर्गत आवश्यक असल्यानुसार वाहन न थांबविणे
  11. अनुज्ञप्तीवरील पृष्ठांकनाचा तपशील न देता अनुज्ञप्ती प्राप्त करणे किंवा अनुज्ञप्तीसाठी अर्ज करणे (कलम १८२) बेसुमार वेगाने वाहन चालवणे ( कलम १८३ )
  12. धोकादायकरित्या वाहन चालवणे ( कलम १८४)
  13. मद्याच्या किंवा अमली पदार्थाच्या अंमलाखाली वाहन चालविणे ( कलम १८५)
  14. वाहन चालवण्यासाठी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या पात्र नसताना वाहन चालवणे ( कलम १८६)
  15. कलम १८३ किंवा १८६ खाली शिक्षापात्र अपराधाला प्रोत्साहन देणे
  16. कलम १८८ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधाला प्रोत्साहन देणे
  17. अनधिकृत शर्यती आणि वेग आजमावण्यात सहभागी होणे ( कलम १८९ ).
  18. असुरक्षित स्थितीतील वाहन वापरणे ( कलम १९०).
  19. परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून वाहन चालवणे ( कलम १९४).
  20. अनुज्ञप्तीमध्ये फेरफार करणे किंवा फेरफार केलेली अनुज्ञप्ती वापरणे.
  21. ज्या अपराधादरम्यान मोटार वाहनाचा वापर केला होता असा, कैदेच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध.
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.