Motor Vehicle Department, Maharashtra

कोविड-19 दरम्यान ऑटोरिक्षा परमिट धारकांना आर्थिक सहाय्य

कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक सहाय्य

सध्याच्या कोविड-१९ साथीच्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षा परवानाधारकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी १५०० रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.

कृपया योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी पुढील टीप वाचा

ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना

  1. कोण अर्ज करू शकेलः महाराष्ट्र राज्यातील सर्व ऑटोरिक्षा परवाना धारक.
  2. आवश्यक तपशील:आपले वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट आणि आधार क्रमांक तयार ठेवा.
  3. आधारद्वारे ऑनलाईन लाभः
    1. ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे.
    2. तुमचा आधार लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर पाठविलेल्या ओटीपीच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी केली जाईल.
    3. याचा फायदा थेट आधार लिंक बँक खात्यात वर्ग केला जाईल.
  4. कुटुंब सदस्याच्या नावे परवाना हस्तांतरण:अर्जदाराने “वारसा/ उत्तराधिकारी” हा पर्याय निवडावा व परवान्याची प्रत अपलोड करावी.
  5. अर्जाची स्थितीचा तपास:आपण समान मोबाइल नंबर वापरुन आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
  6. आपण इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत देखील बँक खाते उघडू शकता आणि ऑटो रिक्षा कोविड -१९ मदत निधीचा लाभ, आधार क्रमांक ह्या बँक खात्याशी जोडून घेऊ शकतात.
  • आधार अर्ज करण्यासाठी किंवा मोबाइल नंबर अद्यावयात करण्यासाठी नोंदणी केंद्राची यादी - येथे क्लिक करा
  • आधारशी जोडलेल्या बँक खात्याची स्थिती तपासण्यासाठी - येथे क्लिक करा
  • आधारशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकाची स्थिती तपासण्यासाठी - येथे क्लिक करा
  • आपली बँक आधार पेमेंट्स ब्रिज सिस्टम (एपीबीएस) सोबत जोडलेली आहे की नाही हे तपासण्यासाठी - येथे क्लिक करा

अर्जाची वेळ: सकाळी ८ ते रात्री  १०

सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न

प्र: माझ्याकडे आधार कार्ड नसल्यास काय करावे?
उत्तर: आधार क्रमांक उपलब्ध नसेल तर कृपया तुमच्या जवळच्या नोंदणी केंद्रात अर्ज करा. आपल्या जवळील आधार नोंदणी केंद्रे तपासण्यासाठी येथे क्लिक करा.

प्र. माझा मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला नसेल तर काय करावे?
उत्तर: आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर सत्यापित करण्यासाठी, कृपया येथे क्लिक करा. आधारमध्ये मोबाइल नंबर अद्ययावत करण्यासाठी आपल्या जवळच्या आधार अद्ययावत केंद्राला भेट द्या. कृपया आपल्या जवळची नोंदणी / अद्ययावत केंद्र शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

प्र. माझे बँक खाते आधारशी जोडले गेलेले नसेल तर काय करावे?
उत्तर: आधार लिंक केलेल्या बँक खात्याची स्थिती सत्यापित करण्यासाठी येथे क्लिक करा. आपण आपले बँक खाते आधारसह अद्ययावत करण्यासाठी आपल्या बँकेत देखील भेट देऊ शकता आणि नंतर योजनेसाठी अर्ज करू शकता.

प्र. मी आधार किंवा आधार लिंक केलेला मोबाइल नंबर / बँक खात्याशिवाय योजनेसाठी अर्ज करू शकतो?
उत्तर: होय, आपण अद्याप ऑफलाइन मोडद्वारे योजनेसाठी अर्ज करू शकता. ऑफलाईन मोडद्वारे अर्ज करण्यासाठी , २३ ऑगस्ट २०२१ नंतर कार्यालयीन वेळेत कृपया आपल्या आरटीओ कार्यालयाला खालील कागदपत्रांसह भेट द्या:
i. वाहन नोंदणी प्रमाणपत्र  - अनिवार्य
ii. ड्रायव्हिंग लायसन्स - अनिवार्य (अर्जदार - स्वतः)
iii. वाहन परवाना - अनिवार्य (अर्जदार - वारसदार / उत्तराधिकारी)
iv. रद्द केलेला चेक (अर्जदाराचे नाव नमूद असलेला) किंवा बँक पासबुक - अनिवार्य
v. आधार कार्ड - अनिवार्य नाही.

प्र. माझा वाहन क्रमांक ४ अंकांपेक्षा कमी आहे, या कारणास्तव मी योजनेसाठी अर्ज करतांना वाहन क्रमांक प्रविष्ट करू शकत नाही. मी अर्ज कसा करू शकतो? 
उत्तर: जर वाहन क्रमांक ४ अंकांपेक्षा कमी असेल तर वाहन क्रमांकापूर्वी शून्य जोडावे लागेल. उदा: जर वाहन क्रमांक MH01AB67 असेल तर अर्जदाराने "MH01AB0067" म्हणून वाहन क्रमांक प्रविष्ट करावा.

प्र. अर्ज करण्यासाठी मला मदत हवी असेल किंवा मी अर्ज करण्यास असमर्थ असल्यास काय?

उत्तर: तुम्ही येथे क्लिक करून वापरकर्त्याच्या मार्गदर्शकाचा संदर्भ घेऊ शकतात. आपण प्रक्रिया व्हिडिओ येथे देखील तपासू शकतात.

प्र. ओटीपी, कॅप्चा किंवा पोर्टलशी संबंधित मुद्दे प्रवेशयोग्य नाहीत किंवा उघडत नाहीत?
उत्तर: अर्जदारांना विहित मुदतीत (सकाळी ८:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत) पुन्हा प्रयत्न करावा.

प्र. मी ऑनलाइन अर्ज केला आहे, मला मदत निधी कधी व कोठे मिळेल?
उत्तर: आपल्या अर्जाचा आढावा घेतल्यानंतर आणि अर्ज मंजूर झाल्यावरच तुम्हाला आधार लिंक असलेल्या बँक खात्यात मदत निधी मिळेल.

प्र. मला अद्याप मदत निधी मिळालेला नाही?
उत्तर: आपण येथे क्लिक करून करून आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

प्र. माझा अर्ज नाकारल्यास काय करावे?
उत्तर: कृपया आरटीओ अधिकाऱ्याने अर्ज नाकारल्याचे कारण वाचा व (लागू असल्यास) अर्जात आवश्यक त्या दुरुस्त्या करून पुन्हा अर्ज करा.

प्र. आधार डेटा जुळत नसल्यामुळे अर्ज नाकारला; अशा परिस्थितीत नागरिक कसा फायदा घेऊ शकतात?
उत्तर: अर्जदाराने आधार तपशील अद्ययावत करण्यासाठी नजीकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय येथील आधार कॅम्प किंवा आधार नोंदणी / अद्ययावत केंद्राला भेट द्यावी आणि ऑनलाईन पोर्टलमार्फत या योजनेसाठी पुन्हा अर्ज करावा किंवा  ऑगस्ट २०२१ नंतर सध्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट द्यावी.

प्र. माझा अर्ज दुरुस्तीसाठी पाठविला गेला तर काय करावे?
उत्तर: कृपया आरटीओ अधिकाऱ्याने अर्ज दुरुस्तीस पाठविण्याचे कारण वाचा व (लागू असल्यास) अर्जात आवश्यक त्या दुरुस्त्या करून पुन्हा अर्ज करा.

प्र. कोणत्या प्रकरणांमध्ये अर्जदारास त्यांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे?
उत्तर: पात्र अर्जदार खालील प्रकरणांसाठी  ऑगस्ट २०२१ नंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह त्यांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट देऊ शकतात:
१. अर्जदाराकडे आधार किंवा आधार लिंक केलेला मोबाइल नंबर / बँक खाते नाही
२. प्रलंबित वाहन मालकी हक्क बदल प्रकरणांसाठी
३. अर्जदाराने चुकीची माहिती भरल्यामुळे अर्ज ऑनलाइन पोर्टलवर कायमस्वरुपी नकारला गेला आणि अर्जदाराला पुन्हा अर्ज करावयाचा असल्यास
४. अर्जदाराची माहिती दुसऱ्या व्यक्तीने भरलेली असल्याने अर्जदार ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करण्यास सक्षम नाही
५. ‘अपलोड परमिट’ संबंधित टिप्पणीसह अर्ज नकारला गेला व अर्जदार परमिट अपलोड करण्यास असक्षम असल्यास
६. नावात बदल झाल्यामुळे अर्जदाराचे नाव आरटीओ रेकॉर्डशी जुळले नाही म्हणून अर्ज नाकारला गेला.
 

प्र. मी माझ्या अर्जाच्या स्थितीबद्दल समाधानी नसल्यास काय करावे?
उत्तर: आपली तक्रार नोंदविण्यासाठी कृपया येथे क्लिक करा. अर्जदार सर्व आवश्यक कागदपत्रांसह  ऑगस्ट २०२१ नंतर त्यांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला देखील भेट देऊ शकतात.

प्र. अर्ज मंजूर झाला, पण मदत निधी बँक खात्यात मिळाला नाही?
उत्तर: कृपया खाली प्रकरणे तपासा – 

प्रकरणाचा प्रकार

उपाय

आधार लिंक असलेले बँक खाते बंद / निष्क्रिय आहे

अर्जदारांनी बँक खात्यात हा निधी जमा झाला आहे की नाही याची तपासणी बँकेकडे करावी व निधी प्राप्त झाला असल्यास पुढील प्रक्रियेसाठी अर्जदाराने बँकेचा सल्ला घ्यावा.

ऑनलाईन अर्जाची स्थिती रद्द करण्यात आल्यास व अर्जदारास पुन्हा अर्ज करण्याचा पर्याय सक्षम असल्यास; अर्जदाराने सक्रिय बँक खाते आधारशी लिंक करून पुन्हा अर्ज करावा. बँक खात्यास आधार जोडण्यापूर्वी बँक आधार पेमेंट ब्रिज सिस्टिम सोबत जोडलेली आहे कि नाही हे तपासावे.

आधारशी लिंक्ड बँक खाते असलेली बँक आधार पेमेंट्स ब्रिज सिस्टम (एपीबीएस) शी जोडलेली नाही.

आधार पेमेंट्स ब्रिज सिस्टम (एपीबीएस) शी जोडलेल्या बँकेच्या बँक खात्याशी अर्जदारांनी त्यांचे आधार लिंक करून, त्यांच्या सध्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट द्यावी.

आधार लिंक्ड बँक खाते सक्रिय आहे आणि बँक देखील एपीबीएसशी जोडलेली आहे

अर्जदारांना ‘Sent for Payment’ संदेशाच्या तारखेपासून ५ दिवस निधी जमा होण्याची प्रतीक्षा करावी. जर अद्याप निधी मिळाला नाही तर अर्जदारांनी  ऑगस्ट २०२१ नंतर पुढील प्रक्रियेसाठी सध्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट द्यावी.

 

अर्जाची वेळ: सकाळी ८ ते रात्री  १०