मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
Call Us : 8390300300 / 18002339985
               0253-2226100 / 0253-6642300

अनुज्ञप्तीची दुय्यम प्रत

कोणाला अर्ज करता येईल

पक्की अनुज्ञप्तीधारक, ज्यांची अनुज्ञप्ती फाटली/निकामी झाली किंवा ज्यांची अनुज्ञप्ती हरवली आहे त्यांना अनुज्ञप्तीच्या दुय्यम प्रतीसाठी अर्ज करता येईल.

 

आवश्यक दस्तऐवज

  1. प्रपत्र एलएलडी
  2. जुनी अनुज्ञप्ती फाटल्यास/ खराब झाल्यास किंवा हरवले असल्यास पोलीस अहवाल
  3. अलिकडच्या छायचित्राच्या ३ प्रती
  4. शुल्क २१४ रू

सूचना : कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा अधिक वाहनचालक अनुज्ञप्ति बाळगता येणार नाही. 

या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.