Motor Vehicle Department, Maharashtra

विभागाविषयी

मोटार वाहन विभाग स्थापनेचा उद्देश

राज्यातील औद्योगिक विकासामुळे ग्रामिण व नागरी क्षेत्रात परिवहन सेवेवर प्रचंड ताण पडलेला आहे. त्याचप्रमाणे जलद परिवहनासाठी दुचाकी वाहने, चार चाकी वाहन इत्यादीची सातत्याने भर पडत चाललेली आहे. याचवेळी रस्त्यावरील गर्दी वाढणे, अपघातांची संख्या वाढणे, वायुप्रदुषण इत्यादी बाबीसुध्दा प्रकर्षाने वाढीस लागलेल्या आहेत. दळणवळणाच्या अद्यावत सेवा, रस्त्यावरील वाहने,वायुप्रदुषण,वाहनांची नोंदणी,तपासणी,चालकांच्या अनुज्ञप्त्या इत्यादी कामामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. ही कामे हाताळण्याकरिता तसेच मोटार वाहने अधिनियम,1988 च्या अंतर्गत तयार झालेले नियम,कर कायदे तसेच प्रवासी कर कायदे इत्यादीची अंमलबजावणी करण्याकरिता मोटार वाहन विभागंाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

मोटार वाहन विभाग राबवित असणारे अधिनियम, नियम इत्यादी.

  1. मोटार वाहन अधिनियम, 1988
  2. केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989
  3. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989
  4. महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम, 1958
  5. महाराष्ट्र मोटार वाहन कर नियम, 1959
  6. महाराष्ट्र मोटार वाहन (प्रवासी कर) अधिनियम, 1958
  7. महाराष्ट्र मोटार वाहन (प्रवासी कर) नियम, 1959
  8. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार,आजिविका अणि नोकया यावरील कर अधिनियम, 1975
  9. महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार,आजिविका अणि नोकया यावरील कर नियम, 1975
  10. रस्त्याद्वारे वहन अधिनियम २००७.
  11. रस्त्याद्वारे वहन नियम 2011.

मोटार वाहन विभागात चालणारे सर्वसाधारण कामकाज

या विभागास विविध कायद्याखाली प्रामुख्याने पुढील कामे करावी लागतात

  1. वाहनांची नोंदणी करणे,
  2. मोटार वाहन कर व प्रवासी कर वसुल करणे,
  3. परवाने (सार्वजनिक प्रवासी/माल वाहतुक) जारी करणे.
  4. शिकाऊ व पक्की वाहन चालक अनुज्ञप्ती देणे
  5. वाहन चालविण्याची चाचणी घेणे
  6. परिवहन वाहनांचे वार्षिक योग्यता प्रमाणपत्र देणे, नुतनीकरण करणे.
  7. नोंदणीकृत वाहनांचे अभिलेख तयार करणे.
  8. वाहन हस्तांतरण, गहाण व्यवहाराची नोंद करणे.
  9. परिवहनाशी निगडीत असलेले खटले हाताळणे.
  10. अपघाती वाहनांची यांत्रिक तपासणी करणे.
  11. रस्त्यावर विविध गुन्हयांसाठी वाहनांची तपासणी करणे.
  12. वायुप्रदुणषणविषयक कामे हाताळणे.
  13. आंतरराज्यीय वाहतुक करारविषयक कामे करणे.
  14. व्यवसाय कर वसुल करणे.

मोटार वाहन विभागाची रचना

  1. परिवहन आयुक्त हे या विभागाचेे सर्वोच्च अधिकारी असून त्यांचे मुख्यालय मंुबई येथे कार्यरत आहे.
  2. राज्यामध्ये एकुण 15 प्रादेशिक परिवहन कार्यालये व 35 उप प्रादेशिक परिवहन कार्यालये कार्यरत असून प्रादेशिक परिवहन अधिकारी हे प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख असतात.
  3. त्याच प्रमाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे जिल्हा पातळीवरील कार्यालयाचे प्रमुख आहेत.
  4. राज्याच्या सीमेलगत एकुण 22 सीमा तपासणी नाके आहेत. परप्रांतातुन येणाया वाहनांची तपासणी व कर वसूली करण्याची कामे अशा सीमा तपासणी नाक्यांवर प्रामुख्याने केली जातात.
  5. राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालये व त्यांच्या अधिनस्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालये व सीमा तपासणी नाके यांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

 

Organization Chart