मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)

विमा

मोटार वाहन विमा

मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 146 आणि 147 अन्वये मोटार वाहन विमा ही कायदेशीर आवश्यकता आहे. त्यामुळे अपघातापासून असणाऱ्या धोक्यापासून आर्थिक संरक्षण प्राप्त होते. विमा प्राप्त नसलेले वाहन चालविणे हे अतिशय धोकादायक आणि बेकायदेशिर आहे.

 • मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत योग्य विमा संरक्षण नसलेले वाहन चालविणे किंवा चालवू देणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे तसेच ते बेजबाबदारपणाचे कृत्य आहे, त्यामुळे प्रत्येकाने ते टाळले पाहिजे.
 • कलम 140 मधील तरतूदीनुसार कुठलीही चूक नसल्याचा दावा करीत रस्ते अपघातग्रस्त झालेली कोणतीही व्यक्ती नुकसानभरपाई प्राप्त करू शकते. तसेच मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 163 नुसार धडक देऊन पळून गेलेल्या मोटार वाहनांमुळे झालेल्या अपघातांच्या बाबतीतही भरपाई देण्याची तरतूद आहे.

मोटार वाहन विम्याचे प्रकार

 • तृतीय पक्ष विमा तथा टीपीए : या मध्ये त्रयस्थ व्यक्तीला झालेल्या नुकसान अथवा धोक्यापासून संरक्षणाचा समावेश आहे. मात्र वैयक्तिक किंवा वाहनाला झालेल्या नुकसानाचा यात समावेश नाही. दुचाकी वाहनांसाठी हा विमा तहहयात अवधीसाठी काढता येउ शकतो. इतर वाहनांच्या बाबतीत या विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. उपलब्ध विमा पॉलिसीपैकी ही सर्वांत स्वस्त पॉलिसी आहे. वैधता समाप्तीच्या दोन महिन्यांच्या आधी या पॉलिसीचे नूतनीकरण करता येते.
 • व्यापक विमा : ही महागडी पॉलिसी आहे. यात वैयक्तिक तसेच तृतीय पक्षाचा समावेश आहे. या पॉलिसीचे दर वर्षी नूतनीकरण करावे लागते आणि वैधता समाप्तीपूर्वी दोन महिन्याच्या आत भारतात कोठेही तिचे नूतनीकरण करता येउ शकते.

दुय्यम विमा प्रमाणपत्र

जर मोटार वाहन विमा प्रमाणपत्र हरवले किंवा खराब झाले असल्यास संबंधित विमा कंपनीकडे अर्ज करून आणि शुल्क भरून दुय्य्‍म प्रत प्राप्त करता येते.

विम्याचे हस्तांतरण

नोंदणीकर्ता मालक बदलल्यास तृतीय पक्ष विम्याचे हस्तांतरण आपोआप होते. जर व्यापक पॉलिसी असल्यास संबंधीत विमा कंपनीकडे अर्ज करून विम्याचे हस्तांतरण करता येऊ शकते.

अपघात दावे

मोटार वाहन अपघातासंबंधी दावे प्राप्त करण्यासाठी संबंधीत विमा कंपनीकडे तपशीलवार दावा दाखल करावा लागेल. दावा दाखल करणाऱ्या व्यक्तीने खालील नमूद दस्तऐवज दावा अर्जाला जोडावे.

 1. वैध वाहनचालक अनुज्ञप्ती.
 2. वैध विमा प्रमाणपत्र.
 3. वैध नोंदणी प्रमाणपत्र.
 4. वैध कर प्रमाणपत्र
 5. प्रथम माहीती अहवाल
 6. परिवहन वाहनासाठी वैध परवाना.
 7. परिवहन वाहनासाठी वैध योग्यता प्रमाणपत्र.
 8. विमा कंपनीच्या प्राधिकृत सर्व्हेयर द्वारे दावा अंदाज अहवाल.
या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.