Motor Vehicle Department, Maharashtra

विद्यमान अनुज्ञप्तीशी संबंधित सेवा

  • पत्त्यातील बदलाबाबत ३० दिवसाच्या आत सूचित केले पाहिजे
  • आवेदन अर्ज – जुन्या आणि नव्या पत्त्याचा समावेश असणारा कोऱ्या कागदावर केलेला अर्ज
  • सादर करावयाचे दस्तऐवज – मूळ वाहनचालक अनुज्ञप्ती, पत्त्याचा पुरावा, लागू असेल तेथे ना हरकत प्रमाणपत्र
  • अर्ज कोठे करावा – ज्या अनुज्ञप्ती प्राधिकरणाने अनुज्ञप्ती दिली आहे त्या प्राधिकरणाकडे अर्ज करावा. जर अर्जदाराचा नवीन पत्ता दुसऱ्या अनुज्ञप्ती प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात असेल तर मूळ अनुज्ञप्ती प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार सध्या तेथे राहतो त्याबाबत, मूळ वाहनचालक अनुज्ञप्ती आणि पत्त्यासह त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे.