माहिती
वाहनचालक अनुज्ञप्तिची वैधता समाप्त होण्याच्या ३० दिवसांपूर्वी अर्जदाराला वाहनचालक अनुज्ञप्तिचे नूतनीकरण करता येईल.
नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करा :
ऑनलाईन अर्ज करा
आवश्यक दस्तऐवज
- नमुना 9 (Form 9)
- वाहनचालक अनुज्ञप्ती
- नमूना १-अ मध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र
- अर्जदाराच्या अलीकडच्या छायचित्राच्या ३ प्रती
वैधता समाप्तीच्या पूर्वी किंवा त्यानंतर ३० दिवसांच्या अतिरिक्त अवधीत वाहनचालक अनुज्ञप्तिचे नूतनीकरण करता येते. अर्जदाराने नूतनीकरणासाठीचा अर्ज अतिरिक्त अवधीनंतर केल्यास वाहनचालक अनुज्ञप्तिचे नूतनीकरण त्या तारखेपासून केले जाते.
वाहनचालक अनुज्ञप्तीची वैधता संपून पाच वर्षे उलटून गेल्यानंतर तिचे नूतनीकरण करता येत नाही.
जर अनुज्ञप्ती दुसऱ्या राज्यातली असली तर अर्जदाराने मूळ अनुज्ञप्ती प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र किंवा वाहनचालक अनुज्ञप्तीची खातरजमा करणारे दस्तऐवज सादर करावे.