मोटार वाहन विभाग,
महाराष्ट्र
24 x 7 नागरी संपर्क केंद्र : 1800 120 8040 (टोल फ्री)

पक्की अनुज्ञप्ती

अर्ज कसे करावे

शिकाऊ अनुज्ञप्ती काढून 30 दिवस झाल्यानंतर पक्क्या अनुज्ञप्तीच्या वाहन चालविण्याच्या चाचणी परिक्षेकरिता अर्ज करु शकतो.

शिकाऊ / पक्के अनुज्ञप्ती अपॉईंटमेंट घेणेकरिता माहिती

 1. पक्की अनुज्ञप्ती यांचे अपॉईंटमेंट घेणेकरिता कृपया
 2. उपरोक्त संकेतस्थळावर जाण्याआधी आपल्या संगणकावर खालील नमुद संगणक प्रणाली असल्याची खात्री करावी:
  • Internet Explorer 9 and above (सदर संकेतस्थळ Mozilla Firefox and Google Chrome यामध्ये दिसून येणार नाही.)
  • Adobe Reader 11 आणि यावरील.
 3. ऑनलाईन अपॉईंटमेंटकरिता मदत केंद्र क्र. 040-23494777 असून कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत सुरु असेल.
 4. पक्क्या अनुज्ञप्तीवर नवीन वर्ग नोंद करण्याकरिता व परिवहन संवर्गातील अनुज्ञप्तीसाठी अर्ज करण्याकरिता कृपया

ऑनलाईन अर्ज करा

 

आवश्यक कागदपत्रे

 1. नमुना 4 (Form 4)
 2. शिकाऊ अनुज्ञप्ती
 3. नजीकच्या कालावधीत काढलेले तीन फोटो.
 4. वयाचा आणि पत्त्याचा केंद्रिय मोटार वाहन नियम 4 नुसार पुरावा.
 5. परिवहन संवर्गातील वाहनांकरिता अर्ज केल्यास मोटार ट्रेनिंग स्कूलचे नमुना 5 मधील प्रमाण्पत्र.
 6. शुल्क्
 7. ज्या वाहनांवर चाचणी द्यावयाची त्या वाहनांची सर्व वैध कागदपत्रे.
 • तो रिअर व्ह्यू ‍मिरर सोयीचा करुन घेऊ शकतो.
 • इंजिन सुरु करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेऊ शकतो.
 • वाहन कोनातून सरळ पुढे ‍सुरक्षितपणे व धक्के किंवा गचके न बसता नेऊ शकतो व त्याच वेळी टॉप गिअरपर्यंतचे सर्व गिअर टाकू शकतो.
 • वाहतूकीच्या ‍परिस्थितीनुसार टॉप गिअर बदलून खालचे गिअर टाकणे आवश्यक असेल तेव्हा चटकन असे गिअर बदलू शकतो.
 • टेकाडावरुन वाहन खाली नेताना चटकन ‍गिअर बदलून खालचे ‍गिअर टाकू शकतो.
 • उभा चढ असेल ‍तिथे हॅन्ड ब्रेकचा किंवा थ्राटल आणि फूट ब्रेकचा योग्य तो उपयोग करुन, वाहन मागे घसरु न देता ते थांबवू शकतो आणि पुन्हा सुरु करु शकतो, उजव्या व डाव्या कोपऱ्यावर बरोबर वळण घेऊ शकतो आणि सिग्नल देण्यापूर्वी ‍रिअर व्हयु चा उपयोग करु शकतो.
 • इतर वाहनांना ओव्हरटेक करु शकतो, त्यांना आपल्याला ओव्हरटेक करु देऊ शकतो, त्यांच्या मार्गाला सुरक्षितपणे, जाऊन भिडू शकतो किंवा तो पार करु शकतो आणि योग्य ते सिग्नल देऊन योग्य त्या खबरदारीने रस्त्यावरील ‍गतिमार्ग (कोर्स) निवडू श्कतो.
 • उचित वेळी, हाताने किंवा वाहनाला बसवलेल्या इलेक्ट्रिकल  इंडिकेटर्सच्या साहाय्याने स्पष्ट व स्वच्छ असे ट्रॅफिक सिग्नल देऊ शकतो.
 • योग्य ‍सिग्नल देऊन आणि योग्‍ काळजी घेऊन लेन्स बदलू शकतो.
 • आकस्मिक निकडीच्या वेळी आणि इतर बाबतीत वाहन थांबवू शकतो आणि इतर बाबतीत वाहन थांबवतांना ते रस्त्यावरील योग्य त्या गतिमार्गावर (कोर्स) सुरक्षितपणे, योग्य ते सिग्नल देऊन उभे करु शकतो.
 • रिव्हर्स गिअर असलेल्या वाहनाच्या बाबतीत, ते वाहन मागे नेऊ शकतो, मर्यादीत मोकळया जागेत वाहन त्याच्यावर नियंत्रण्‍ ठेवूण व पुरेशा अचूकपणे, डावीकडे किंवा उजवीकडे मागे नेऊ शकतो.
 • फॉरवर्ड व रिव्हर्स ‍गिअर्सच्या साहाय्याने वाहनाचे तोंड विरुध्द दिशेकडे करु शकतो.
 • वाहतूक चिन्हे, वाहतूक ‍ दिवे, वाहतूक नियंत्रक पोलीस यांनी दिलेल्या सिग्नलप्रमाणे प्रमाणे बरोबर आणि ताबडतोब कृती करु शकतो व रस्ता वापरणाऱ्या इतर लोकांनी दिलेल्या सिग्नल वरुन योग्य ती कृती करु शकतो.
 • जेथे ट्रॅफिक लाईट वा ट्रॅफिक पोलीस नसेल अशा पादचारी क्रॉसिंगजवळ, रस्ता ओलांडणाऱ्यांना अगोदर जाऊ देऊन बरोबर कृती करु शकतो.
 • नेहमीच्या वाहनचालनाच्या वेळी वाहन डाव्या बाजूला ठेवू शकतो.
 • रस्त्याच्या व वाहतूकीच्या वेगवेगळया परिस्थितीनुसार वेग कमी-जास्त करु शकतो.
 • वाहन आत्मविश्वासाने योग्य दिशेने चालवून, हिसके न बसता सुरळीतपणे गिअर बदलून आणि आवश्यक तेव्हा ब्रेक लावून वाहनावरील आपला एकंदर ताबा दाखवू शकतो.
 • सिग्नल देणे, वाहन सुरु करणे, पुढे मागे करुन मर्यादित जागेत नेणे (मनूव्हर) वा तेथून बाहेर काढणे जागेवरुन हालणे, ओव्हरटेक करण्यासाठी कोर्स (गतिक्रम) बदलणे, उजवीकडे वळणे किंवा थांबणे या सर्व क्रियांपूर्वी रिअर व्हयू मिररचा योग्य तो उपयोग करु शकतो.
 • वाहन सरळ पुढे नेताना, उजवीकडे वळवताना, डावीकडे वळवताना आरस्ते एकत्र येतात तेथे रस्त्याची योग्य ती बाजू वापरु शकतो.
 • ॲक्सिलरेटर, क्लच, गिअर्स, ब्रेक (हॅन्ड व फूट) ‍रिंग ‍ स्टिअरिंग आणि हार्न यांचा योग्य वापर करु शकतो.
 • पादचारी, इतर वाहनांचे चालक आणि सायकलस्वार कशी कृती करतील याचा अंदाज करु शकतो.

वाहनचालक चाचणी यशस्वीरित्या पार केल्यानंतर चालकास परवाना दिला जाईल. जर चालक वाहनचालक चाचणी पास करू शकला नाही तर तो सात दिवसांच्या कालावधी नंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो.

सूचना : मोटर वाहन कायद्याच्या कलम 6 नुसार कोणीही व्यक्ती एकापेक्षा जास्त स्थायी ड्रायव्हिंग लायसन्स ठेवणार नाही.

या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली माहिती फक्त मार्गदर्शक स्वरूपाची आहे. कोणत्याही कायदेशीर बाबी साठी मोटार वाहन कायदा 1988 व तदनुषांगीक कायदे व नियम लागू राहतील.