कोणाला अर्ज करता येईल
वयाची १८ वर्षे पूर्ण करणारी कोणतीही व्यक्ती वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी अर्ज करण्यास पात्र राहिल. १६ वर्ष वयाचे अर्जदार आपल्या पालकांच्या संमतीने ५० सीसी पेक्षा जास्त कमी इंजिन क्षमतेची, गीअररहित मोटारसायकल चालविण्यासाठी अनुज्ञप्तीसाठी अर्ज करू शकतात.
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी परिवहन संर्वगातील वाहन चालवण्यासाठीच्या अनुज्ञप्तीसाठी वय वर्ष २० असणे आवश्यक आहे. हलके मोटार वाहन चालवण्याचा एक वर्षापेक्षा जास्त अनुभव असेल तरच त्याला शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करता येईल.
शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी – पूर्वतयारी
व्यापक प्रश्नसंचयासाठी येथे इथे दाबा
शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट
-
शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्यासाठी कृपया
- ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी 040-23494777 हा मदत केंद्र दूरध्वनी क्र. सक्रिय असून कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत सुरु असेल.
आवश्यक दस्तऐवज
- शारीरिक तंदुरुस्ती संदर्भात अर्ज आणि घोषणापत्र नमूना क्र 1
- शिकाऊ अनुज्ञप्ती प्रदान करण्यासाठी नमूना क्र. 2
- अर्जदाराची पारपत्र आकाराच्या छायाचित्रांच्या ३ प्रती
- निवासाचा पुरावा
- वयाचा पुरावा
- नागरिकत्वाचा पुरावा
- शुल्क
चाचणी कार्यपद्धती/मुद्दे
प्रक्रियेच्या प्रवाहासाठी येथे क्लिक करा
- शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करण्यासाठी उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करावा लागेल तसेच प्राथमिक चाचणी द्यावी लागेल.
- निर्धारित भेटीच्या दिवशी आपल्या रहिवास क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागेल.
- आवश्यक दस्तऐवज सादर करा
- चाचणी द्या
- ६०% प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यास उमेदवार चाचणीत उत्तिर्ण ठरेल. अनुत्तिर्ण ठरल्यास पुन्हा नव्याने अपॉइंटमेट घेऊन चाचणी देता येईल.
ऑनलाईन अर्ज करा