Motor Vehicle Department, Maharashtra

ना हरकत प्रमाणपत्र

ना हरकत प्रमाणपत्र (N.O.C)

ना हरकत प्रमाणप्रत्राकरिता : इथे दाबा

अर्ज कसे करावे

  1. नमूना 28 (Form–28)(प्रत्येक प्रतीवर नोंदणीकृत वाहन मालकाची स्वाक्षरी आणि चेसिस प्रिंट चिकटवून अर्जाच्या 3 प्रती)
  2. नमूना 29 (Form-29)वाहनाची विक्री असल्यास.
  3. वित्त पुरवठादाराचे ना हरकत प्रमाणपत्र, असल्यास.
  4. सदर वाहनाच्या चोरीबाबत कोणताही खटला दाखल किंवा प्रलंबित नसल्याबाबत पोलीस खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र (महाराष्ट्र राज्याबाहेरून ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचे असल्यास)
  5. वाहनाचे सर्व वैध दस्तऐवज – पीयुसी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र

ना हरकत प्रमाणपत्र रद्द करणेबाबत

अर्ज कसे करावे

  1. मूळ नोंदणी प्राधिकाऱ्याकडून प्राप्त केलेले मूळ ना हरकत प्रमाणपत्र जमा करावे.
  2. ज्या नोंदणी प्राधिकाऱ्याने पूर्वी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते, त्या नोंदणी प्राधिकाऱ्याचे सदर वाहनाची नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
  3. सदर वाहनाचा आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यापासून त्या प्रमाणपत्राचा गैरवापर न केल्याबाबत वाहन मालकाचे प्रतिज्ञापत्र
  4. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रू. १०० इतके शुल्क
  5. वाहनाचे सर्व वैध दस्तऐवज