Motor Vehicle Department, Maharashtra

तात्पुरती नोंदणी

महत्वाचे

  • कोणत्याही वितरकाला वाहन विकत घेऊ इच्छिणाऱ्याला नोंदणी न केलेले मोटार वाहन देता येणार नाही. आर टी ओ कडे पक्की/तात्पुरती नोंदणी करूनच त्याला वाहनाचा ताबा देता येईल.
  • वाहन मालकाला नोंदणी न केलेले वाहन वापरण्याची परवानगी देता येणार नाही.
  • आर. टी. ओ. कडे नोंदणी न झालेले मोटार वाहन कोणालाही चालवता येणार नाही.

तात्पुरत्या नोंदणीची आवश्यकता कोणाला

  • चेसिसवर बॉडी/ सांगाडा तयार करण्यासाठी वेळ लागतो, अशी परिवहन वाहने
  • वितरकाच्या जागेपासून नोंदणीच्या ठिकाणी वाहन नेण्याकरीता तात्पुरती नोंदणी आवश्यक आहे.
  • आपले वास्तव्य असलेल्या अथवा व्यवसाय असलेल्या ठिकाणी, अर्थात सामान्यत:ज्या ठिकाणी आपले वाहन ठेवले जाते, त्या कार्यकक्षेतील नोंदणी प्राधिकरणाकडे तुमच्या वाहनाची नोंदणी करा.

तात्पुरते नोंदणी करीत : इथे दाबा

कार्यपध्दती

  • तात्पुरत्या नोंदणीकरीता नमुना C.R Tem. A. मध्ये अर्ज करावा.
  • आपले वास्तव्य असलेल्या अथवा व्यवसाय असलेल्या ठिकाणी, अर्थात सामान्यत:ज्या ठिकाणी आपले वाहन ठेवले जाते, त्या कार्यकक्षेतील नोंदणी प्राधिकरणाकडे तुमच्या वाहनाची नोंदणी करा.

वैधता

  • तात्पुरती नोंदणी सुरवातीच्या ७ दिवसांसाठी वैध असेल आणि परिवहनेतर वाहनांच्या बाबतीत ती ३० दिवसांपेक्षा जास्त अवधीसाठी वाढवता येणार नाही. परिवहनेतर संवर्गातील वाहनांकरीता नोंदणी प्राधिकरणाच्या अनुमतीने सदर वैधता अवधी वाढवता येऊ शकेल.