राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने प्रादेशिक परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयाने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व पिक्सेलस्टेट यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या 'रस्ता सुरक्षा लघुपट' स्पर्धेत अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या तीस लघुपटांची नावे जाहीर झाली आहेत. या शिवाय सर्वसामान्य प्रेक्षकांचा कौल जाणून घेण्यासाठी हे लघुपट 'यू ट्युब'वर उपलब्ध करून दिल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रतिकात्मक आरंभ करण्यात आलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून सुमारे ३०० व्यावसायिक व हौशी लघुपटकर्त्या टीम्सनी नोंदणी करत मोठा प्रतिसाद दिला. त्यातूनच अंतिम फेरीसाठी हे तीस लघुपट निवडण्यात आले आहेत.
आता 'यू ट्युब'वर सहजी बघता येणारे हे लघुपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावेत आणि आपली पसंती व प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे आवाहन चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले आहे. परीक्षकांनी निवडलेल्या लघुपटांशिवाय प्रेक्षकांना सर्वाधिक आवडलेल्या कृतींनाही विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत.*https://www.youtube.com/c/Maharoadsafety* Like and Share या लिंकवरून हे निवडक लघुपट पाहता येतील.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या तीस लघुपटांची नावे तुम्ही खालील सांकेतिक स्थळावर पाहू शकता http://maharoadsafety.com/filmfestival2021/