Motor Vehicle Department, Maharashtra

अपात्रता आणि निरस्तीकरण

मोटार वाहन‍ अधिनियम 1988 च्या कलम 19 नुसार अनुज्ञप्ती देणा-या प्राधिकरणास चालकास अनुज्ञप्ती (लायसन्स) धारण करण्यास अपात्र ठरविण्याचा, किंवा असे लायसन्स रद्द करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.

मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 19 मधील कोणत्याही कारणासाठी अुज्ञप्ती धारण करणा-या व्यक्तीस आपली बाजु मांडण्यांची वाजवी संधी दिल्यानंतर प्राधिकारी अपात्रतेचे किंवा अनुज्ञप्ती रद्द केल्याचे आदेश पारित करु शकतील.

मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 19 मधील तरतुदी पाहाव्यात. त्यापैकी ठळक बाबी खालील प्रमाणे आहेत.

  1. तो, सराईत गुन्हेगार किंवा सराईत दारुबाज आहे.
  2. तो, गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यवहारावर प्रभाव करणारे पदार्थ अधिनियम, 1985 (1985 चा 61) याच्या अर्थानुसार कोणत्याही गुंगीकारक औषधीद्रव्याचा किंवा मनोव्यवहारावर परिणाम करणा-या पदार्थाच्या आधिन आहे.
  3. तो दखलपात्र गुन्हयामध्ये मोटार वाहनाचा वापर करित आहे किंवा त्यांने तसा वापर केला आहे.
  4. चालक म्हणुन त्यांच्या पूर्वीच्या वर्तवणुकीवरुन असे दिसते की, त्यांच्या मोटार चालविल्यामुळे लोकांना धोका पोहचविण्याचा संभव आहे.
  5. त्यांने लबाडीने किंवा चुकीची माहिती देऊन कोणतेही लायसन्स किंवा कोणत्याही विशिष्ट वर्गाचे किंवा वर्णनाचे लायसन्स मिळविले आहे.
  6. या अधि‍नियमाची उद्दिष्टे लक्षात घेता, लोकांना उपद्रव पोहोचण्याची किंवा धोका निर्माण होण्याची शक्यता असलेली कृती म्हणुन केंद्र शासनाकडुन विहित केली जाऊ शकेल अशी कोणतीही कृती त्याने केली आहे.
  7. कलम 22च्या पोटकलम (3) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली चाचणी देण्यात त्याने कसुर केली आहे किंवा त्या चाचणीत तो उत्तीर्ण झालेला नाही.
  8. अठरा वर्षाखालील व्यक्ती असल्यामुळे तिची काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या लेखी संमतीने शिकावू अनुज्ञप्ती देण्यात आलेली आहे आणि अशा व्यक्तीने आता काळजी घेण्याचे सोडुन दिलेले आहे.