Motor Vehicle Department, Maharashtra

राज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे (RMA)

महत्वाचे

एखाद्या राज्यात नोंद असलेले वाहन एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी दुसऱ्या राज्यात न्यायचे अथवा वापरायचे असल्यास, अशा वाहनाची दुसऱ्या राज्यामध्ये नोंद करून नवीन नोंदणी क्रमांक घेणे आवश्यक आहे. असे करताना मूळ नोंदणी प्राधिकाऱ्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आणि वित्त पुरवठादाराकडून सहमती घेणे गरजेचे आहे.

राज्या बाहेरील वाहनाची नोंदणी आणि नवीन नोंदणी क्रमांक देणे : इथे दाबा

अर्ज कसे करावे

  1. नमूना 20, नमूना 26.
  2. नमूना 33 पत्ता बदल असल्यास.
  3. नमूना 29, नमूना 30 वाहन हस्तांतरण असल्यास.
  4. नमूना FT,नमूना AT.
  5. वित्तपुरवठादाराच्या संमतीसह मूळ नोंदणी प्राधिकाऱ्याकडून चेसिस प्रिंट जोडलेले नमूना 28 स्वरूपात ना हरकत प्रमाणपत्र.
  6. नमूना TCA, TCR परिवहन संवर्गातील वाहनांसाठी.
  7. प्रथम नोंदणी झाल्यापासून 30 महिन्यांच्या आत वाहन आणले असल्यास, प्रवेश कर भरल्याचा पुरावा
  8. सदर वाहन कुठल्याही अपघातात, गुन्ह्यात अथवा चोरी प्रकरणात सहभागी नसल्याबाबत वाहन मालकाचे प्रतिज्ञापत्र.
  9. शुल्क्‍
  10. वाहनाचे सर्व वैध दस्तऐवज – मूळ आरसी, विमा, पीयुसी